मुंबईकरांची वाहन खरेदीला पसंती

मुंबईकरांची वाहन खरेदीला पसंती

Published on

मुंबईकरांची वाहन खरेदीला पसंती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी केली. शहरातील वाहनांच्या दालनांमध्ये गत चार ते पाच दिवसांपासून ग्राहकांनी वाहन नोंदणी केली हाेती. आज गुढीपाडव्यानिमित्त वाहने घरी नेण्यात आली. पाडव्याच्या आठवड्यात एकूण ७,६३२ वाहनांची खरेदी नोंद आहे. यात ५,१८० दुचाकी आणि १,६८९ चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

गुढीपाडव्यानिमित्त घरात नवे वाहन आणण्यासाठी मुंबईकरांनी ११ ते १८ मार्चदरम्यान वाहन खरेदी केली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गाडी घेऊन त्याची पूजा करण्यात आली. मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयापैकी (आरटीओ) सर्वाधिक २,५७४ वाहन नोंद मुंबई मध्य अर्थात ताडदेव आरटीओमध्ये झाली आहे. त्याखालोखाल मुंबई पूर्व (वडाळा) मध्ये २,३३१ आणि बोरिवलीत १,६१९ वाहनांची नोंद झाली. १,१०८ वाहन नोंद ही सर्वात कमी वाहन नोंदणी मुंबई पश्चिम म्हणजेच अंधेरीमध्ये झाली आहे.
....
वाहन खरेदी नोंदणी (११ ते १८ मार्च)
आरटीओ - एकूण संख्या - दुचाकी - चारचाकी
अंधेरी - १,१०८ - ७०६ - २४७
ताडदेव - २,५७४ - १७०० - ६२५
मुंबई पूर्व - २,३३१ - १,८४७ - ४७५
बोरिवली - १,६१९ - ९३७ - ३४२

Marathi News Esakal
www.esakal.com