आभासी अटकेद्वारे 
दोन वृद्धांची फसवणूक

आभासी अटकेद्वारे दोन वृद्धांची फसवणूक

Published on

आभासी अटकेद्वारे
दोन वृद्धांची फसवणूक
मुंबई, ता. १९ : दादर आणि दहिसर येथे वास्तव्यास असलेल्या दोन वृद्धांना आभासी अटकेत ठेवून भामट्यांनी तब्बल १.९६ कोटी रुपये उकळले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे नोंदवून तपास सुरू केला.

दादर येथील ७१ वर्षीय वृद्धाकडून १.०५ कोटी रुपये उकळण्यात आले. तक्रारदार वृद्ध खासगी कंपनीत मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. भामट्यांनी त्यांना सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधून ५० हजार कोटींच्या घोटाळ्यात सहभाग समोर आल्याने अटक केली जाईल, असे सांगून भीती घातली. तपासाच्या निमित्ताने वृद्धाकडून १.०५ कोटी रुपये विविध खात्यांवर वळते करून घेऊन संपर्क तोडला. भामट्यांनी तक्रारदारास सुमारे ११ दिवस आभासी अटकेच्या नावे घरात कोंडून राहण्यास भाग पाडले. दुसऱ्या घटनेत दहिसर येथील सेवानिवृत्त वृद्धेकडून ९१ लाख रुपये उकळले.

Marathi News Esakal
www.esakal.com