मुंबई
बालकांच्या अपहरणाचा डाव उधळला
बालकांच्या अपहरणाचा डाव उधळला
मुंबई : सतर्क रहिवाशामुळे घाटकोपर येथे दोन लहान बालकांना पळवून नेण्याचा प्रयत्न उधळल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार १७ मार्चला रात्री दामोदर पार्क परिसरात घडला. मैत्री सोसायटीच्या बागेत एक अनोळखी व्यक्ती शिरला आणि सात वर्षांच्या बालिकेचा हात धरून सोबत नेऊ लागला. वाटेत त्याने अन्य बालिकेला उचलून घेतले. हा प्रकार इमारतीतील रहिवासी मोहम्मद शम्सी यांनी पाहिला आणि त्याला हटकले. तेव्हा ही व्यक्ती मुलींना सोडून पळू लागली. शम्सी यांनी इतरांच्या मदतीने या व्यक्तीस पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. सरजुप्रसाद केशुलाल बनवासी (३४) असे त्याचे नाव असून, तो मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी, तपास करीत आहेत.

