महिला अधिकारी साहित्य 
संमेलनाध्यक्षपदी मेहेंदळे

महिला अधिकारी साहित्य संमेलनाध्यक्षपदी मेहेंदळे

Published on

महिला अधिकारी साहित्य
संमेलनाध्यक्षपदी मेहेंदळे

मुंबई, ता. २० : नवी दिल्ली येथे महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ११ व १२ एप्रिलला हाेणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ प्रशासकीय (निवृत्त) अधिकारी लीना मेहेंदळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
पुणे येथील सरहद संस्था, नवीन महाराष्ट्र सदन यांच्या वतीने आणि मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने या संमेलनाचेे आयाेजन करण्यात आले आहे. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१व्या जयंतीचे औचित्य साधून या संमेलनाचे आयाेजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड करण्यात आल्याची घाेषणा संमेलनाच्या निमंत्रक आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली.
मेहेंदळे यांचे विविध विषयांवर ५००पेक्षा अधिक लेख आणि २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांची १९ पुस्तके अनुवादाची आहेत. लहान मुलांसाठीही त्यांनी विपुल लेखन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com