महाराष्ट्र व पवार नगरचा पुनर्विकास १५ वर्ष रखडपट्टी

महाराष्ट्र व पवार नगरचा पुनर्विकास १५ वर्ष रखडपट्टी

Published on

महाराष्ट्र व पवार नगरचा पुनर्विकास रखडला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : ठाणे पश्चिम येथील महाराष्ट्र नगर व पवार नगरचा पुनर्विकास प्रकल्प गेल्या १५ वर्षांपासून पूर्णपणे रखडला आहे. हिरानंदानी मेडोज आणि काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ असलेल्या या जागेवर म्हाडाअंतर्गत कोकण निर्माण व विकास महामंडळाचा प्रकल्प सुरू झाला होता, पण आता ३४८ सभासद हक्काच्या घरांपासून वंचित राहिले आहेत. शुक्रवारी (ता. २०) मुंबईतील मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक रहिवासी संग्राम सिंह, प्रभाकर महाडिक, अशोक सिंह आणि विना पाटील यांनी आपली व्यथा मांडली.

बांधकाम व्यावसायिकाकडे पैसे नसल्याने प्रकल्प थांबल्याचे त्यांनी रहिवाशांना सांगितले आहे. रहिवाशांनी घर घेण्यासाठी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. वर्षानुवर्षे हप्ते भरूनही त्यांना नवीन घरे मिळाली नाहीत. आता कर्जाचे ओझे डोक्यावर असूनही घर नाही, ही परिस्थिती असह्य झाल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरात लवकर आमची हक्काची घरे द्या, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी स्थानिक नेते आणि म्हाडा अधिकाऱ्यांकडेही त्यांनी तक्रारी गेल्या आहेत, पण अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या प्रकरणाने ठाण्यातील इतर पुनर्विकास प्रकल्पांनाही धक्का बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, रहिवासी आता न्यायालयाचा मार्ग अवलंबण्याबाबत विचार करत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com