ट्रान्स हार्बरसह पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
ट्रान्स हार्बरसह पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
मेल, एक्स्प्रेस सेवांवर परिणाम; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : रेल्वेमार्गांवरील देखभाल, दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी रविवारी (ता. २२) मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामांमुळे काही उपनगरी लोकल सेवा रद्द राहतील, तर काही गाड्या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या मेगाब्लॉकचा मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम होणार आहे.
ट्रान्स हार्बर
कुठे : ठाणे ते वाशी, नेरूळ अप आणि डाऊन मार्ग
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी, नेरूळदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहतील. तसेच ठाणेहून वाशी, नेरूळ, पनवेलकडे जाणाऱ्या सेवा सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ दरम्यान रद्द असतील. पनवेल, नेरूळ, वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकल सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ पर्यंत रद्द राहतील.
पश्चिम रेल्वे
कुठे : प्रभादेवी स्थानक (सर्व मार्ग)
कधी : रविवारी मध्यरात्रीनंतर १.३० ते रविवारी सकाळी ६.०० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत काही उपनगरी सेवा रद्द राहतील, तर काही गाड्या दादर आणि वांद्रे येथे शॉर्टटर्मिनेट करून परतीच्या दिशेने चालवण्यात येतील. तसेच या कालावधीत चर्चगेट ते प्रभादेवी आणि माटुंगा रोड ते माहीमदरम्यान कोणतीही लोकल सेवा धावणार नाही.
पश्चिम रेल्वे (वसई रोड ते विरारदरम्यान)
कुठे : वसई रोड ते विरार अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर
कधी : शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत वसई रोड ते विरारदरम्यान धावणाऱ्या धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या विरार, वसई रोड ते बोरिवलीदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.
या गाड्या धावणार उशिराने
ब्लॉकमुळे गाडी क्र. ०९१८४ वाराणसी-मुंबई सेंट्रल वातानुकूलित विशेष दोन तास उशिराने चालवली जाईल, गाडी क्र. २२९४६ ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल एक तास ४५ मिनिटे उशिराने धावेल. गाडी क्र. १२९२८ एकता नगर-दादर सुपरफास्ट एक तास उशिराने, तर गाडी क्र. १२९०२ अहमदाबाद-दादर गुजरात मेल एक तास उशिराने चालवली जाईल. गाडी क्र. ०९०५२ भुसावळ- दादर स्पेशल ४५ मिनिटे उशिराने धावेल. तसेच २२ मार्च रोजी मुंबई सेंट्रल-अहमदाबाद गुजरात सुपरफास्ट (गाडी क्र. २२९५३) ही गाडी नियोजित सकाळी ५.४० ऐवजी सकाळी ६.१० वाजता सुटेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

