मुंबईकरांना दिलासा! मार्चअखेर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा; ''समाधानकारक'' श्रेणीसह प्रदूषणात घट •​आजचा सरासरी एक्यूआय ६१ वर;

मुंबईकरांना दिलासा! मार्चअखेर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा; ''समाधानकारक'' श्रेणीसह प्रदूषणात घट •​आजचा सरासरी एक्यूआय ६१ वर;

Published on

मुंबईकरांना दिलासा!
मार्चअखेर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २१ : काही दिवसांपासून मुंबईच्या हवेत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असतानाच, शनिवारी (ता. २१) मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता शनिवारी ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदवण्यात आली. दुपारपर्यंत सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ६५ इतका नोंदवला गेला. विशेष म्हणजे, तीन दिवसांपासून हा निर्देशांक सातत्याने १०० च्या खाली राहिल्याने मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येत आहे.

​हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, मुंबईत तीन दिवसांत प्रदूषणाची पातळी खाली घसरली आहे:​१८ मार्च : ८३ (समाधानकारक), ​१९ मार्च ः ६० (समाधानकारक), आणि ​२० मार्च ः ६१ (समाधानकारक) अशी एक्यूआयची नोंद झाली. तर ​शनिवारी (ता.२१) ६५ एक्यूआयची नोंद झाली. ​मुंबईतील २३ सक्रिय केंद्रांवरील आकडेवारीनुसार, उपनगरांच्या तुलनेत काही भागात प्रदूषण अजूनही मध्यम स्वरूपाचे आहे.​ सर्वात स्वच्छ हवा पवई (३१ एक्यूआय) आणि कांदिवली पूर्व (३६ एक्यूआय) येथे हवेची गुणवत्ता अत्यंत उत्तम नोंदवण्यात आली.​

सर्वात जास्त प्रदूषण घाटकोपर (९८), शिवाजी नगर (९७) आणि वांद्रे-कुर्ला संकुल (८१) या भागात प्रदूषणाची पातळी मुंबईच्या सरासरीपेक्षा जास्त आहे, तर ​इतर प्रमुख भाग असलेल्या कुलाबा (८१), देवनार (६४), माझगाव (७४) आणि मुलुंड पश्चिम (३३) अशी नोंद झाली आहे.

प्रदूषणाचे कण विरळ
​हवामानतज्ज्ञांच्या मते, ६५ हा निर्देशांक समाधानकारक श्रेणीत येतो. यामुळे सर्वसामान्यांना कोणताही त्रास होत नाही. मात्र, श्वसनाचे विकार असलेल्या अतिसंवेदनशील व्यक्तींना अल्पसा त्रास जाणवू शकतो. मार्च महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस एक्यूआय १२५ च्या पुढे गेला होता. मात्र, आता वाऱ्याचा वेग आणि बदलत्या हवामानामुळे प्रदूषणाचे कण विरळ झाले आहेत.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com