मुंबई
एक महिन्यांच्या बाळासह कुटुंब दर्शनासाठी दाखल
एक महिन्याच्या बाळासह कुटुंब दर्शनासाठी दाखल
मुंबई, ता. २१ ः श्री गुरू पादुका दर्शन सोहळ्याला मुंबईत दिमाखात सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक वरळीच्या एनएससीआय डोममध्ये हा सोहळा होत आहे. माझगावच्या श्रद्धा मिसाळ या आपल्या एका महिन्याच्या मुलीला घेऊन दर्शनासाठी दाखल झाल्या होत्या. श्री गुरुमाउलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन त्या आणि त्यांचे अख्खे कुटुंब भारावून गेले होते. दर्शनानंतर त्यांच्या चेहऱ्यावरून आनंदाश्रू वाहत होते. ‘२१ संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आम्हाला एक महिना लागला असता; पण आज इथे एकाच ठिकाणी दर्शन झाले, याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी या वेळी दिली.

