पाडकामाआधी बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करा : वर्षा गायकवाड

पाडकामाआधी बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करा : वर्षा गायकवाड

Published on

पाडकामाआधी बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करा : वर्षा गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : ‘कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गाच्या कामासाठी देण्यात आलेल्या नोटिसींमुळे हजारो झोपडपट्टीवासीयांवर बेघर होण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे कोणतेही पाडकाम करण्यापूर्वी संबंधित कुटुंबांचे योग्य आणि कायमस्वरूपी पुनर्वसन करावे,’ अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली आहे.

लोकसभेतील शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना गायकवाड यांनी सांगितले, की ‘कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गालगत असलेल्या सुमारे ३,१५४ झोपड्यांना रेल्वे प्रशासनाकडून पाडकामाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही वस्ती दोन दशकांहून अधिक काळापासून अस्तित्वात असून येथे हजारो कष्टकरी कुटुंबे वास्तव्यास आहेत. तीन हजारांहून अधिक झोपड्यांचे पाडकाम केल्यास अनेक कुटुंबे अचानक बेघर होतील. त्यामुळे हे पाऊल अमानवी आणि अव्यवहार्य ठरेल.’ पाडकामाआधी बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईत मोठ्या प्रमाणावर नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास असून केंद्र सरकारच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी ठोस धोरण नसल्याची त्यांनी सांगितले. राज्य आणि केंद्र सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी पुनर्वसन धोरण तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली असून कोणत्याही परिस्थितीत या कुटुंबांना बेघर करू नये, अशी भूमिकाही गायकवाड यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com