महापालिकेत भाजपची ‘मिशन करप्शन फ्री’ रणनीती
महापालिकेत भाजपची ‘मिशन करप्शन फ्री’ रणनीती
माजी खासदार किरीट सोमय्यांचे नगरसेवकांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. आगामी काळातील पक्षाची रणनीती, प्रशासकीय पारदर्शकता आणि शहराच्या विकासकामांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राबवताना लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका कशी असावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या वेळी नगरसेवकांना विशेष मार्गदर्शन केले, अशी माहिती सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिली.
भाजपच्या या बैठकीत किरीट सोमय्या यांच्यावर सोशल इम्पॅक्ट रिस्पॉन्सिबिलिटीची (एसआयआर) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोमय्या यांनी नगरसेवकांना त्यांच्या संबंधित प्रभागात या मोहिमेअंतर्गत कशा प्रकारे सक्रिय सहभाग घ्यावा, याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. संपूर्ण संघटना या विषयावर अत्यंत गांभीर्याने काम करीत असून, ही मोहीम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईच्या वाहतूक कोंडीवर भाष्य करताना गणेश खणकर यांनी भाजपची विकासात्मक भूमिका मांडली. ते म्हणाले, की कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटली आहे. आता त्याच धर्तीवर पश्चिम उपनगरांमध्येही कोस्टल रोड होणे काळाची गरज आहे. मुंबईकरांचा दोन ते तीन तासांचा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे; मात्र हा विकास करताना निसर्गाचा समतोल राखलाच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे.
प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी नगरसेवकांनी कशा प्रकारे काम करावे, यावरही बैठकीत सविस्तर मंथन झाले. तसेच नवीन नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी आणि जनहिताची कामे कशी मार्गी लावावीत, याबाबत चर्चा झाली. महत्त्वाचे विषय सभागृहासमोर कशा प्रकारे प्रभावीपणे मांडायचे याची रणनीतीही या वेळी निश्चित करण्यात आली. या बैठकीमुळे आगामी काळात मुंबई महापालिकेत भाजप अधिक आक्रमक आणि रचनात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

