मच्छीमारांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
मच्छीमारांना सक्षम, स्वावलंबी करण्यासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह विविध योजनांद्वारे शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मंत्रालयात सोमवारी (ता. २३) मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन., माजी आमदार प्रमोद जठार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, राष्ट्रीय मत्स्यविकास मंडळाचे सदस्य प्रकाश एम. लोणारे, विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पारंपरिक मासेमारीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादन क्षमतेत वाढ करणे हा शासनाचा उद्देश असल्याचे राणे यांनी सांगितले. त्यासाठी मच्छीमारांना अत्याधुनिक बोटी, जाळी तसेच कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. तसेच मत्स्यव्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण, कर्ज सुविधा आणि अनुदान योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किनारपट्टी विकासाला गती
किनारपट्टी भागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, बंदरांचे आधुनिकीकरण तसेच मत्स्यप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यावरही शासन लक्ष केंद्रित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे हे सरकारचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगताना युवकांनी गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाकडे वळावे, यासाठी प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली. शासनाच्या या उपक्रमांमुळे राज्यातील मच्छीमार समुदाय अधिक सक्षम होईल आणि मत्स्यव्यवसायाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

