डिझेल दरवाढीने मच्छीमार अडचणीत!

डिझेल दरवाढीने मच्छीमार अडचणीत!

Published on

डिझेल दरवाढीने मच्छीमार अडचणीत!
नितेश राणे ः इंधन दर स्थिरतेसाठी धोरणाची गरज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : डिझेल दरवाढीमुळे मच्छीमारांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नात केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांना पत्र पाठविले आहे.
राज्यातील १३६ मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत सुमारे सात हजार ५५० यांत्रिक मासेमारी नौकांना डिझेल कोटा मंजूर असला, तरी दरवाढीमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मच्छीमार सहकारी संस्थांना ‘बल्क कन्झ्युमर’ या वर्गात टाकल्याने त्यांना किरकोळ दरापेक्षा अधिक दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या तुलनेत मच्छीमारांवर अधिक आर्थिक भार पडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमार, मजूर, मासळीविक्रेते तसेच संबंधित व्यावसायिकांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. मत्स्यव्यवसाय हा अन्नसुरक्षा आणि निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचा क्षेत्र असतानाही शेतीप्रमाणे इंधन अनुदान किंवा संरक्षण यंत्रणा उपलब्ध नसल्याची बाबही या वेळी अधोरेखित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना केल्यास राज्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com