३३ बांधकामांवर वर्सोव्यात हाताेडा
३३ बांधकामांवर
वर्सोव्यात हाताेडा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेच्या के-पश्चिम विभागाने आज मोठी कारवाई केली. वेसावे येथील प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या ३३ बेकायदा बांधकामे पाडण्यात आली आहेत. यामुळे वेसावे ते दहिसरदरम्यानच्या कामाला गती मिळणार आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही कारवाई उपायुक्त भाग्यश्री कापसे आणि सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. हटवलेल्या बांधकामांत तीन निवासी आणि २९ व्यावसायिक गाळ्यांचा समावेश आहे. यातील एका मालमत्ताधारकाने न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर उद्या (ता. २४) सुनावणी होणार आहे.
मोहिमेदरम्यान म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या आणखी १२ बांधकामांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित आहे. आजच्या कारवाईसाठी के-पश्चिम विभागाचे अतिक्रमण निर्मूलन पथक आणि वेसावे पोलिस ठाण्याचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. किनारी रस्त्याचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी पालिकेने आता आक्रमक पावले उचलली आहेत.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

