मुंबई
राज्यकर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
राज्य कर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
मुंबई, ता. २४ ः जीएसटी परतावा फाईलचे काम करून दिल्याबद्दल लाच मागून ती घेणारे राज्य कर निरीक्षक अविनाश मेश्राम यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा नोंदवला. मंगळवारी या कारवाईबाबत माहिती देताना एसीबी प्रवक्त्याने सांगितले, खासगी कंपनीच्या वार्षिक परतावा फाईलचे काम करून दिल्यानंतर मेश्राम यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. एसीबीने गुरुवारी (ता. १९) केलेल्या पडताळणीत मेश्राम यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते.

