

‘एमएड’ सीईटीला ८६.६० टक्के उपस्थिती
मुंबई, ता. २५ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) व मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एमएचएमसीटी) या दोन अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षा बुधवारी (ता. २५) झाली. यामध्ये एमएड सीईटी परीक्षेला राज्यातून ८६.६० टक्के व एमएचएमसीटी सीईटी परीक्षेला ५२.७३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती लावल्याची माहिती प्रशासनाने दिली.
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील ४६ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. ‘एमएड’च्या सीईटी परीक्षेला तीन हजार ९८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन हजार ४५१ विद्यार्थ्यांनी ही सीईटी प्रवेश परीक्षा दिली. ५३४ विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते, तर ‘एमएचएमसीटी’च्या सीईटीला ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २९ विद्यार्थ्यांनी ही सीईटी दिली, तर २६ विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.