अदाणी इलेक्ट्रिसिटी दुसऱ्यांदा भारतात मानांकनात प्रथम

अदाणी इलेक्ट्रिसिटी दुसऱ्यांदा भारतात मानांकनात प्रथम
Published on

अदाणी इलेक्ट्रिसिटी दुसऱ्यांदा भारतामध्ये मानांकनात प्रथम

मुंबई, ता. २५ : अदाणी ग्रुपचा भाग असलेली अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने देशभरातील ६६ वीज वितरण कंपन्यांच्या मूल्यमापनात सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वोच्च क्रमांकाची वितरण सेवा कंपनी म्हणून आपले स्थान कायम ठेवले.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आरईसी लिमिटेड यांच्या सहकार्याने हे मूल्यमापन प्रसिद्ध केले आहे. यात ९२.५ गुणांसह कंपनीने महत्त्वाच्या निकषांवर सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटीला ए प्लस मानांकन मिळाले असून, यामागे पुरवठ्याची विश्वसनीयता, बिलिंगमधील अचूकता आणि प्रभावी तक्रार निवारण यांचा मोठा वाटा आहे. सलग दुसऱ्या वर्षी पहिला क्रमांक मिळवणे हे आमच्या संघाच्या सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध कामाचे फळ आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कंदर्प पटेल यांनी सांगितले.
मुंबईत तीस लाखांहून अधिक ग्राहकांना कंपनी सेवा देते. अदाणी इलेक्ट्रिसिटीची कामगिरी आर्थिक आणि कार्यकारी कार्यक्षमता, संसाधनांची उपलब्धता, पुरवठा नियोजन तसेच प्रगत मीटरिंग आणि ॲनालिटिक्सद्वारे केलेल्या सक्षम डिजिटायझेशनचे प्रतिबिंब आहे.
या रँकिंगमध्ये खासगी आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा दिसून आली. त्यात टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लि., नोएडा पॉवर कंपनी लि., दक्षिण गुजरात वीज कंपनी लि. आणि बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग यांचा समावेश आहे. संपूर्ण क्षेत्रात ग्राहक सेवा निर्देशांक सुधारले असून, सहा कंपन्यांना ए प्लस रेटिंग मिळाले आहे, तर कोणतीही कंपनी सर्वांत खालच्या श्रेणीत आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com