

डम्परच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
मुंबई, ता. २५ : डम्परच्या धडकेत रवींद्र राणे (७५) यांचा सोमवारी (ता. २३) मृत्यू झाला. हा अपघात मुलुंड पूर्वेकडील गणेश चित्रपटगृहाजवळ घडला. या अपघातास जबाबदार धरत नवघर पोलिसांनी डम्परचालक उस्मान शाह यास अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेपाडा येथील पालखी सोसायटीत राहणारे राणे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम मार्ग येथून पायी जात होते. त्याच सुमारास आरोपी चालक शाह डम्पर मागे घेत होता. त्याने पायी जाणाऱ्या राणे यांना न पाहता डम्पर मागे घेतला. त्यामुळे राणे डम्परखाली चिरडले गेले. दोन्ही पायांवरून व हातावरून डम्पर गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मुलुंड येथील वीर सावरकर रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. आरोपी चालकाने डम्पर मागे घेताना कोणतीही खबरदारी घेतली नव्हती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.