गुरु पादुका भजनमंडळाने जिंकली मने

गुरु पादुका भजनमंडळाने जिंकली मने
Published on

गुरू पादुका भजन मंडळाने जिंकली मने
श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाला बजावली सेवा
मुंबई, ता. २५ : नुकत्याच मुंबईत झालेल्या सकाळ माध्यम समूहाच्या ‘भक्ती शक्ती व्यासपीठ’ आणि ‘एपी ग्लोबाले’द्वारे आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवात गुरू पादुका भजन ग्रुप या दाक्षिणात्य कलाकारांच्या मंडळाने मराठी भक्तिगीते सादर करून भाविकांची मने जिंकली. मूळचे तमिळनाडूमधील गुरू ज्ञानानंद गिरी आणि त्यांचे शिष्य सद्‍गुरू स्वामी हरिदास गिरी यांना मानणाऱ्या मुंबईकर भजनी मंडळाने पादुका दर्शन उत्सवात ‘रूप पाहता लोचनी’, ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’, ‘एक तत्त्व नाम’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई’, ‘माझे माहेर पंढरी’ अशी अनेक सुश्राव्य भजने सादर केली.
भजन-कीर्तनाच्या माध्यमातून देवाच्या नावाचा प्रसार करा. ‘रामकृष्ण हरी’चा जप केल्याने आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळेल, असा गुरुमंत्र ज्ञानानंद गिरी यांनी हरिदास गिरी यांना दिला होता. त्याचे पालन त्यांचे हे आठ शिष्य करीत आहेत. हरिदास गिरी हे दक्षिण भारतीय संप्रदायाचे भजन शिकले; मात्र पुढे गुरूंच्या आदेशावरून ते पंढरपूरला गेले आणि त्यांनी विठ्ठलाची भजने शिकून ती दक्षिण भारतात लोकप्रिय केली. कांचीपुरमजवळील तेनांगूर येथील आश्रमात विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्ती आहेत. हरिदास गिरी यांनी नागपूरला पहिले कीर्तन केले आणि त्यानंतर त्यांनी कीर्तने करण्यास सुरुवात केली. मुंबईतही त्यांनी संत तुकाराम, संत एकनाथ महाराजांवर कीर्तन-प्रवचने केली. त्यांनी दिल्ली, पुणे, नाशिक, अमेरिका, सिंगापूर, मस्कत, मलेशिया येथे मराठी व तमिळमधून कीर्तन, प्रवचने केली आहेत. महाराष्ट्रातही फारसे कोणाला ठाऊक नसलेले मराठी अभंग त्यांनी म्हटले आहेत.
---
सर्व कलाकार उच्चपदस्थ
सुदर्शन यांचा व्यवसाय असून आनंद, प्रसाद संगमेश्वरन, विघ्नेश (मृदंगवादक), हरिदास, हरीश अय्यर, संतोष (ढोलकीवादक), सीताराम (पेटीवादक) हे सर्व कलाकार मुंबईत विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. शंकरा टीव्हीतर्फे १० वर्षांपूर्वी भजनसम्राट स्पर्धेत हरिदास गिरी यांच्या आश्रमातून हा गट एकत्र आला. हा गट आठवड्यातून एक-दोनदा सरावाला एकत्र येतो. आम्ही कोणत्याही व्यावसायिक हेतून भजने म्हणत नाही. आम्ही कोणीही फारसे शास्त्रीय गायन शिकलेलो नाही; मात्र आवडीतूनच भजन-कीर्तन शिकलो आणि नंतर त्याचा अभ्यासही केला, असे ही मंडळी सांगते.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com