अवैध वाहतुकीला आळा नाही

अवैध वाहतुकीला आळा नाही
Published on

अवैध वाहतुकीला आळा नाही
एसटीला कोट्यवधींचा फटका; संयुक्त कारवाईचा अभाव; ३५ टक्के मार्ग प्रभावित, उत्पन्नावर मोठा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला हादरा देणारी अवैध वाहतूक अद्याप बेधडक सुरू असून, तिच्यावर नियंत्रण आणण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ आणि आरटीओ विभागाने संयुक्त मोहीम राबवणे अपेक्षित असताना त्याचा अभाव दिसून येत आहे. परिणामी एसटीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच यासंदर्भात बैठक घेऊन स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र स्थानिक स्तरावर या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. काही ठिकाणी आरटीओकडून झालेल्या कारवाईची आकडेवारी एसटी अधिकाऱ्यांकडून स्वतःच्या नावावर सादर केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
राज्यात हजारो अवैध छोटी वाहने तसेच काही परवानाधारक वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करीत असून, टप्पे वाहतुकीमुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. सुमारे ३५ टक्के मार्ग या अवैध वाहतुकीमुळे प्रभावित झाले आहेत.
चालू आर्थिक वर्षात एसटीला सुमारे १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असले, तरी सुमारे ७५० कोटी रुपयांची तूट राहण्याची शक्यता आहे. प्रभावित मार्गांवर काटेकोर नियोजन आणि संयुक्त कारवाई केल्यास एसटीला नफ्यात आणणे शक्य असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com