

अल्पवयीन प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न
मित्रामुळे अनर्थ टळला; आरोपी अटकेत
मुंबई, ता. २६ ः नाते तोडणाऱ्या प्रेयसीवर भररस्त्यात कोयत्याचा वार करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मुलुंड पोलिसांनी अटक केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता. २५) सकाळी नऊच्या सुमारास मुलुंड घडली. अल्पवयीन तरुणीच्या मित्राने हल्लेखोर तरुणास नेमक्या वेळी अडवल्याने पुढील अनर्थ टळला, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर अवघ्या चार तासांत आरोपीस मुकुंद परिसरातून अटक करण्यात आली. आशीष बनसोडे (२१) असे त्याचे नाव असून, तो बदलापूरचा रहिवासी आहे. त्याच्याविरोधात बदलापूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षे अल्पवयीन तरुणी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते; मात्र काही दिवसांपूर्वी तरुणीने हे संबंध नाकारले. तिने आरोपीसोबतचा संपर्क पूर्णपणे तोडला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या आरोपीने मंगळवारी पाठलाग करीत मुलुंड गाठले आणि महाविद्यालयात शिरणार इतक्यात तिला अडवले. तपासाशी संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या बॅगेत कोयता दडवला होता. त्यावरून आरोपी तरुणीच्या हत्येचा उद्देश मनात ठेवून होता. त्याने तरुणीचा गळा आवळून बोलत का नाहीस, असा प्रश्न विचारला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. एका क्षणी आरोपीने बॅगेत दडवलेला कोयता काढून तिच्यावर उगारला. तोच तरुणीचा मित्र मध्ये पडला. त्याने आरोपीला अडवले. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत मित्राच्या मानेवर कोयता लागून किरकोळ जखम झाली. भोवती गर्दी जमा झाल्याने आरोपीने तेथून पळ काढला. त्यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली.
...
बदलापूर पोलिस ठाण्यात तक्रार
घटना घडली त्याच्या आदल्या दिवशीही आरोपी बनसोडे याने तक्रारदार तरुणीला गाठून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा तरुणीने बदलापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. या नोंदीआधारे पोलिस आरोपी बनसोडे याच्यावर कारवाई करणार त्याआधीच मुकुंद येथील घटना घडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.