‘थिंग्स वी डोन्ट सी’ या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

‘थिंग्स वी डोन्ट सी’ या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन
Published on

‘थिंग्स वी डोन्ट सी’चे प्रकाशन
एल. सी. सिंग यांच्या आत्मचरित्रातून प्रेरणादायी प्रवास उलगडला
मुंबई, ता. २६ : उद्योगपती व लेखक एल. सी. सिंग यांच्या ‘थिंग्स वी डोन्ट सी’ या आत्मचरित्राचे मुंबईत प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातून त्यांनी आपल्या आयुष्यातील वैयक्तिक अनुभव, संघर्ष आणि यशाचा प्रवास मांडला आहे.
या प्रकाशन सोहळ्याला आलोक शाह, नॅसकॉमचे संस्थापक हरीश मेहता, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सह-संस्थापक रामदेव अग्रवाल, माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग, टीसीएसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी एस. महालिंगम तसेच निर्मल जैन उपस्थित होते.
‘थिंग्स वी डोन्ट सी’ हे पुस्तक एका छोट्या गावातील मुलाच्या मोठी स्वप्ने पाहण्याच्या आणि ती पूर्ण करण्याच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी सांगते. बालपणातील आठवणींपासून ते जागतिक स्तरावरील कार्यापर्यंतचा त्यांचा प्रवास यात उलगडला आहे.
यावेळी बोलताना एल. सी. सिंग म्हणाले, हे पुस्तक केवळ माझा प्रवास मांडण्यासाठी नाही, तर आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आहे. अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या छोट्या क्षणांतच आयुष्य घडत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com