

मुंबई ः मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने सादर केलेल्या २०२६-२७च्या ४,२४८.०८ कोटींच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीत मंजुरी दिली आहे. पालिका प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने कोणताही बदल न करता महापालिका प्रशासनाकडे पाठवला आहे. शिक्षण विभागासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज अनुक्रमे ३,७५८.०८ कोटी आणि भांडवली खर्च ४९० कोटी इतका प्रस्तावित करण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात २९२.४४ कोटी रुपयांची अधिकची तरतूद केली आहे. अर्थसंकल्प पालिका प्रशासनाकडे अंमलबजावणी करण्यासाठी पाठवण्यात
आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.