महापौर, महाअधिवक्त्यांचा ‘क्रेडाई’कडून सत्कार

महापौर, महाअधिवक्त्यांचा 
‘क्रेडाई’कडून सत्कार
Published on

महापौर, महाधिवक्त्यांचा ‘क्रेडाई’कडून सत्कार

मुंबई, ता. २७ : मुंबई महानगरातील विकसकांची संघटना क्रेडाई-एमसीएचआयच्या वतीने अध्यक्ष सुखराज नाहर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित विशेष सत्कार समारंभात महापौर रितू तावडे आणि महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुंबई आणि एमएमआरशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर विधायक संवाद साधण्यात आला.

सत्कार करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता बीरेंद्र सराफ, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी (आयएएस), पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज (आयएएस) तसेच नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टस (एनजीएमए), मुंबईच्या संचालिका निधी चौधरी (आयएएस) यांचा समावेश होता. प्रशासन व विकास क्षेत्रातील इतर मान्यवर व्यक्तींचाही गौरव करण्यात आला. या उपक्रमाद्वारे क्रेडाई-एमसीएचआयने धोरणकर्ते आणि संस्थांबरोबर विचारविनिमय करून शाश्वत विकासाला चालना देणे, पायाभूत सुविधांना बळकटी देणे आणि मुंबई तसेच एमएमआरमधील शहरी विकासाची एकूण गुणवत्ता उंचावणे यासाठीची आपली बांधिलकी अधाेरेखित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com