

बीएड सीईटीच्या परीक्षेला ८९.१५ टक्के विद्यार्थी उपस्थित
तीन केंद्रांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई, ता. २७ ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बॅचलर ऑफ एज्युकेशन - बीएड (जनरल व स्पेशल) व बीएड (ईएलसीटी) या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षा आजपासून सुरू झाल्या. आज तीन सत्रांत परीक्षा घेण्यात आल्या. तिन्ही सत्रांत मिळून ८९.१५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आज तांत्रिक कारणामुळे तीन परीक्षा केंद्रांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
बीएड सीईटीची परीक्षा २७, २८ व २९ मार्चपर्यंत होत आहे. बीएडच्या सीईटी परीक्षेला १,१०,०४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ५४ हजार ०३४ विद्यार्थ्यांची परीक्षा आजच्या तिन्ही सत्रात आयोजित केली होती. सकाळच्या सत्रात २१,५५५ विद्यार्थ्यांपैकी १९,४८४ विद्यार्थ्यांनी ही सीईटी प्रवेश परीक्षा दिली. दुपारच्या सत्रात २२,२०० विद्यार्थ्यांपैकी १९,४७९ विद्यार्थ्यांनी ही सीईटी प्रवेश परीक्षा दिली. सायंकाळच्या सत्रात १०,२७९ विद्यार्थ्यांपैकी ९,१९९ विद्यार्थ्यांनी ही सीईटी प्रवेश परीक्षा दिली. बीएडच्या आजच्या सीईटी परीक्षेमध्ये सकाळच्या सत्रात परभणी व नांदेड येथील दोन व दुपारच्या सत्रातील नागपूर येथील एक परीक्षा केंद्रावर तांत्रिक कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या परीक्षा २८ किंवा २९ मार्चला घेण्यात येतील.
...
तांत्रिक अडचणी
परभणी येथील एमजीएम अकॅडमी येथील परीक्षा सुरू असताना इलेक्ट्रिक शॉटसर्किट झाल्यामुळे तेथील यंत्रणा बंद पडली. यामुळे या परीक्षा केंद्रातील सकाळच्या सत्रातील २९१ विद्यार्थी व दुपारच्या सत्रातील २७८ विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तसेच नांदेड येथील मराठवाडा परीक्षा केंद्रावर तांत्रिक कारणामुळे सकाळच्या सत्रातील ४३० विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली. दुपारच्या सत्रात नागपूर येथील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना विद्युतप्रवाह बंद झाल्यामुळे तेथील यंत्रणा बंद पडली. यामुळे या परीक्षा केंद्रातील दुपारच्या सत्रातील ३०० विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.