कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक

कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक
Published on

कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक
लोकल वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान पूल क्रमांक ६१च्या गर्डर बदलण्याच्या कामासाठी २८ आणि २९ मार्चला विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार असून काही सेवा रद्द किंवा आंशिक रद्द राहणार आहेत.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्चला रात्री १०.३० ते २९ मार्चला सायंकाळी ७.३०पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच २९ मार्चला पहाटे १ ते ४.३० या वेळेत डाऊन जलद मार्गावरही ब्लॉक असेल. धीम्या मार्गावरील ब्लॉकदरम्यान गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील. डाऊन जलद मार्गावरील ब्लॉकदरम्यान राम मंदिर, मालाड आणि कांदिवली या स्थानकांवर डाऊन दिशेने गाड्यांना थांबा दिला जाणार नाही. या काळात अंधेरी ते बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गावरून गाड्या चालवल्या जाणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीत बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक एक आणि दोनवर कोणतीही गाडी ये-जा करणार नाही. काही उपनगरी सेवा अंधेरी आणि गोरेगाव येथेच आंशिक रद्द करण्यात येणार आहेत. तसेच सर्व १५ डब्यांच्या धीम्या लोकल अंधेरी ते बोरिवलीदरम्यान दोन्ही दिशांनी जलद मार्गावरून धावतील. या बदलांची सविस्तर माहिती सर्व उपनगरी स्थानकांवरील स्थानकप्रमुख कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com