

मोठ्या आतड्याच्या कर्करोगाबाबत मुंबईकरांमध्ये जागरूकतेचा अभाव
राष्ट्रव्यापी सर्वेक्षणाचा निष्कर्ष; तक्रारींकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : बदलती जीवनशैली, बाहेरील अन्नाचे वाढते सेवन आणि तंबाखूच्या वापरामुळे पचनसंस्थेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असून, मोठ्या आतड्याच्या कर्करोगाबाबत मुंबईकरांमध्ये चिंताजनक अनभिज्ञता दिसून येत आहे.
देशात वेगवान जीवनशैली, अयोग्य आहार आणि निष्क्रिय दिनचर्येमुळे पचनासंबंधी तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशा तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या आतड्याच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. ‘लाइफस्टाइल अँड डाइजेस्टिव्ह हेल्थ अवेअरनेस’ या विषयावर करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणात मुंबईतील केवळ १८.९ टक्के लोकच मलाबरोबर रक्त येणे हे कर्करोगाचे लक्षण मानतात, तर बहुसंख्य लोक याबाबतीत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निष्कर्षांची माहिती मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत कर्करोगतज्ज्ञ डॉ. ज्योती बाजपेयी, डॉ. मुबारकुनिसा टोंसे आणि डॉ. दर्शित शाह यांनी दिली.
सर्वेक्षणानुसार, ५० टक्क्यांहून अधिक लोक आठवड्यात किमान तीन वेळा बाहेरचे किंवा पॅकेज्ड अन्न खातात, तर २८ टक्के लोक जवळपास दररोज असे अन्न सेवन करतात. तसेच ५४.८ टक्के लोक नियमित व्यायाम करीत नाहीत आणि ३९.९ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. हे सर्व घटक मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. याशिवाय ८० टक्क्यांहून अधिक लोक अॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा अपचन यांसारख्या समस्यांवर डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच औषधे घेत असल्याचेही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. विशेषतः ४० टक्के तरुण लक्षणांकडे दुर्लक्ष करून त्यांना सामान्य जीवनशैलीचा भाग मानतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ८० टक्क्यांहून अधिक लोकांना मलात रक्त येणे, हे कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते, याची कल्पनाच नाही.
...
सल्ला घेणे आवश्यक
तज्ज्ञांच्या मते, मलविसर्जनाच्या सवयींमध्ये बदल, मलाबरोबर रक्त येणे, पोटदुखी, थकवा किंवा विनाकारण वजन घटणे, अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेवर तपासणी, विशेषतः कोलोनोस्कोपीसारख्या चाचण्यांमुळे हा आजार लवकर ओळखता येतो आणि त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. मुंबईत ८५ टक्क्यांहून अधिक लोक लक्षणे असूनही डॉक्टरांकडे जात नाहीत, तर ८६ टक्के लोक बाहेरील किंवा पॅकेज्ड अन्नावर अवलंबून आहेत, ही बाब अधिक चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.