एमसीए सीईटीची आज परीक्षा

एमसीए सीईटीची आज परीक्षा
Published on

एमसीए सीईटीची आज परीक्षा

मुंबई, ता. २९ ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश परीक्षा सोमवारी (ता. ३०) होणार आहे. राज्यातील ५५ हजार ५६७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
या अभ्यासक्रमांसाठीची ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने असून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर होत आहे. एमसीए सीईटीच्या परीक्षेमध्ये एका परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला असून नागपूर येथील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाऐवजी नागपूर येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे सुधारित प्रवेशपत्र डाऊनलोड करून सुधारित परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित राहावे, अशी सूचना सीईटी कक्षाने केली आहे.
...
मागील चार वर्षांतील नोंदणी
प्रवेश परीक्षा २०२३-२४ २०२४-२५ २०२५-२६ २०२६-२७
एमसीए ३४,२४६ ३९,९६५ ५६,२५७ ५५,५६७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com