गॅस टंचाईची झळ; मुंबईत अर्धी हॉटेल्स बंद

गॅस टंचाईची झळ; मुंबईत अर्धी हॉटेल्स बंद
Published on

गॅसटंचाईची झळ; मुंबईत अर्धी हॉटेल बंद
३० टक्के कामगार गावी; मेन्यू कार्डमधील पदार्थ घटले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा परिणाम भारतातील एलपीजी पुरवठ्यावर होत आहे. केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाक आणि व्यावसायिक वापराच्या गॅसमध्ये दरवाढ केली. त्यानंतर आता व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अपुरा पुरवठा होत आहे. यामुळे मुंबईतील ५० टक्के हॉटेल बंद करावी लागत असल्याचे हॉटेल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतात दरवर्षी सुमारे ३३ दशलक्ष मेट्रिक टन एलपीजीची मागणी असून, त्यातील जवळपास दोनतृतीयांश भाग आयातीवर अवलंबून आहे तसेच आयातीपैकी सुमारे ८५-९० टक्के पुरवठा मध्य पूर्व देशांकडून येतो. भारतातील विविध शहरांमध्ये गॅसचा तुटवडा भासू लागला आहे. त्यानंतर ७ मार्चला गॅसच्या दरात वाढ झाल्यानंतर एलपीजी सिलिंडरची मागणी वाढली. दरम्यान, गॅसपुरवठा अपुरा आहे.
हॉटेल संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या हॉटेलांकडे अतिरिक्त एलपीजी साठा आहे तोपर्यंत ती चालतील. साठा संपल्यानंतर ती हॉटेलही बंद होतील. पुरवठा पूर्ववत झाला नाही तर येत्या काही दिवसांत मुंबईतील आणखी हॉटेल बंद करण्याची वेळ येईल.
मुंबईतील बहुसंख्य हॉटेल आणि रेस्टॉरंट एलपीजी व्यावसायिक गॅस सिलिंडरवर अवलंबून आहेत. रोजच्या व्यवसायासाठी अनेक सिलिंडर लागत असतात. हा पुरवठा खंडित झाल्‍यास हॉटेलचे किचन बंद करण्याची वेळ येऊ शकते. काही हॉटेलांनी आधीच उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून, मेन्यू कार्डमधील पदार्थ कमी केले आहेत.

व्यावसायिक गॅसचा पुरवठा अपुरा असल्याने अनेक आस्थापना एक तर पूर्णपणे बंद पडत आहेत किंवा कामाचे तास व मेन्यूतील पदार्थांची संख्या कमी करून चालवत आहेत. मुंबईतील ५० टक्के हॉटेल बंद करावी लागली आहेत. आणखी २० ते ३० टक्के हॉटेल येत्या काही दिवसांत बंद होण्याची शक्यता आहे. ३० टक्के कामगार परत गेले आहेत. सध्या हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असल्यामुळे परमिट रूम श्रेणीतील आस्थापनांच्या उत्पादन शुल्क परवान्याच्या नूतनीकरणासाठी किमान तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी.
- विजय शेट्टी, अध्यक्ष, आहार संघटना

गॅस तुटवड्यामुळे मेन्यू कार्डमधील पदार्थ कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांत बंद रेस्टॉरंटची संख्या वाढत आहे. आधीच नुकसान असताना इलेक्ट्रिक शेगडी, वायरिंग आणि इतर खर्चाची भर पडली आहे.
- ध्रुवीर गांधी, हॉटेलचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com