

रुग्णांना मिळणार मेडिसीन बॉक्स
राज्यातील सरकारी रुग्णालयांत सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : राज्यातील सरकारी रुग्णालयांत औषधांची कमतरता असल्यास रुग्णांना उपचारासाठी बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागतात. त्यामुळे गरीब आणि गरजू वर्गावर आर्थिक भार वाढतो. या समस्येवर उपाय म्हणून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने रुग्णांना रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच मेडिसीन बॉक्स देण्याचा निर्णय घेतला आहे. या बॉक्समध्ये त्यांच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधे उपलब्ध असतील.
सरकारी रुग्णालयांतील औषध पुरवठ्यातील अनियमितता आणि साठ्याच्या कमतरतेला गांभीर्याने घेत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. त्याचबरोबर त्यांनी ही नवी योजना सुरू केली आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या मेडिसीन बॉक्समुळे त्यांना आवश्यक औषधे वेळेवर मिळणार आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी इशारा दिला आहे, की जर कोणत्याही रुग्णाला बाहेरून औषधे आणण्यास सांगितल्याची तक्रार आली तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. या बॉक्समुळे संबंधित औषधांचा साठा संपला तरी त्याचा परिणाम रुग्णांवर होणार नाही. या मेडिसीन बॉक्समध्ये औषधांसोबत इंजेक्शन, हँड ग्लोव्ह्ज, आयव्ही सेट असे साहित्यही उपलब्ध असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.