बेस्ट बसचालक संजय मोरेला अखेर जामीन

बेस्ट बसचालक संजय मोरेला अखेर जामीन
Published on

बेस्ट बसचालक संजय मोरेला अखेर जामीन
कुर्ला बस दुर्घटनाप्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : कुर्ला  पश्चिम येथे गेल्या वर्षी  झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघात प्रकरणातील आरोपी चालक संजय मोरेला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. मोरेवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण नोंदवून सत्र न्यायालयाने दोनवेळा जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मोरेने जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर न्या. आर. एम. जोशी यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. नजीकच्या काळात खटला पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने मोरेला जामीन मंजूर केला.

गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता  कुर्ला  पश्चिमेकडील एस. जी. बर्वे मार्गावर चालक मोरे याचे नियंत्रण सुटल्याने बेस्ट बसने अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली होती.  या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ जण जखमी झाले होते. याशिवाय, २२ वाहनांचे नुकसानही झाले होते. मोरे एक अनुभवी बेस्टचालक असून, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालवू नये, असा युक्तिवाद मोरेच्या वकिलांनी केला. तसेच, इलेक्ट्रिक बस चालवण्याचे केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण आणि अशा बस चालवण्याशी संबंधित अनुभवाचा अभाव ही बाब मान्य केली तरी ही कृती बेदरकार आणि निष्काळजीने वाहन चालवणे असू शकते, त्यावरून सदोष मनुष्यवधाचा आरोपाअंतर्गत खटला चालवता येऊ शकत नाही, असेही मोरेकडून युक्तिवाद करताना सांगण्यात आले. मोरे गेल्या वर्षभरापासून कोठडीत आहेत आणि सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्षीदारांची यादी खूप मोठी आहे, असा युक्तिवाददेखील करण्यात आला.


कंपनीचे अधिकारी दोषमुक्त
आरोपी मोरेवर खुनाच्या आरोपाप्रकरणी आरोप निश्चित करण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती. मात्र, सत्र न्यायालयाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी मोरेवर खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केला. तर सत्र न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी प्रकरणातील इतर दोन आरोपी आणि अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बेस्ट बसची मालकी असलेल्या दोन खासगी कंपन्यांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषमुक्त केले होते. त्यात एव्ही ट्रान्स (एमयूएम) प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रमेश कटीगंडला आणि मोरया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम सूर्यवंशीचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com