

मालाड, ता. २ (बातमीदार) : मालाड पूर्वेतील पोद्दार रोड परिसरातील जुन्या संजीवनी रुग्णालयाजवळील ‘ईश्वर भुवन’ इमारतीला बुधवारी (ता. १) रात्री सुमारे ११.३५ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काही रहिवासी इमारतीत अडकले होते. मात्र, अग्निशमन दल, पोलिस व इतर यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू करण्यात आले. लगतच्या इमारतींची छते एकमेकांशी जोडलेली असल्याने काही नागरिकांनी छतावर आश्रय घेत शेजारच्या इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही
जीवितहानी झाली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.