आयपीएल ब्रॉडकास्ट अभियंत्याचा आढळला मृतदेह

आयपीएल ब्रॉडकास्ट अभियंत्याचा आढळला मृतदेह
Published on

आयपीएल ब्रॉडकास्ट अभियंत्याचा आढळला मृतदेह

मुंबई, ता. ३१ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्या चमूतील ब्रॉडकास्ट इंजिनिअर जॅन विल्यम लँगफोर्ड (७६) यांचा मृतदेह सोमवारी (ता. ३०) ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळून आला. लँगफोर्ड ब्रिटिश नागरिक होते. पोलिस उपआयुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना लँगफोर्ड त्यांच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळले. कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारार्थ बॉम्बे रुग्णालयात नेले, मात्र तेथे उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवचिकित्सा पार पडली असून अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. तोवर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू करण्यात आली. आतापर्यंतच्या चौकशीत संशयास्पद असे काहीही आढळलेले नाही, असेही उपआयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com