रेल्वेत दिव्यांग प्रवाशाला मारहाण करणारे ताब्यात

रेल्वेत दिव्यांग प्रवाशाला मारहाण करणारे ताब्यात
Published on

रेल्वेत दिव्यांग प्रवाशाला मारहाण करणारे ताब्यात
महिलेसह अल्पवयीन मुलावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डब्यात प्रवेश करून एका दिव्यांग प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी ४५ वर्षीय महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई घटना घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत करण्यात आली.
कर्जत जलद लोकलच्या दिव्यांग डब्यात शुक्रवारी (ता. २७) दुपारी २.४५ वाजता ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोहमार्ग पोलिस आयुक्त राकेश कलासागर यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर व कुर्ला रेल्वे पोलिसांनी समांतर तपास करीत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी महिला कुर्ला स्थानकावर उतरून पश्चिमेकडील शहर भागात गेल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान कुर्ला-कलिना परिसरातील रहिवासी नंदा दीपक पवार (४५) आणि तिच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत महिलेने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात उल्हासनगर येथील दिव्यांग प्रवासी व साक्षीदार मनीष राजू होतवाणी (४३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपी महिलेला दादर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
...
पीडित प्रवाशाचा शोध सुरू
या प्रकरणातील पीडित दिव्यांग प्रवाशाचा शोध घेण्यासाठी कुर्ला रेल्वे पोलिसांनी तीन विशेष पथके स्थापन केली आहेत. तपासादरम्यान संबंधित प्रवाशाचे नाव सज्जाद असल्याचे समोर आले. त्याने घाटकोपर येथे उतरून पुन्हा सीएसएमटीकडे जाणारी अप धीमी लोकल पकडल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. घाटकोपर ते सीएसएमटीदरम्यानच्या स्थानकांवरील फुटेजची पडताळणी तसेच परिसरात शोध घेऊनही संबंधित व्यक्ती अद्याप सापडलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com