सायबर फसवणुकीतील रक्कमचे पेट्रोल पंपाद्वारे रोखीकरण

सायबर फसवणुकीतील रक्कमचे पेट्रोल पंपाद्वारे रोखीकरण
Published on

सायबर फसवणुकीतील रकमेचे पेट्रोलपंपाद्वारे रोखीकरण

प्रमुख आरोपीस अटक; जे. जे. मार्ग पोलिसांकडून तपास सुरू


मुंबई, ता. ३१ : सायबर फसवणुकीतील रक्कम पेट्रोलपंपाच्या माध्यमातून रोख करून घेणाऱ्या टोळीचा जे. जे. मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीने आतापर्यंत सायबर फसवणुकीतील लाखो रुपयांचे रोखीकरण केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

एका फसवणूक प्रकरणाचा तपास करताना त्यातील रक्कम हद्दीतील पेट्रोलपंपाच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती जे. जे. मार्ग पोलिसांना मिळाली. त्यामुळे अचंबित झालेल्या पोलिसांनी गोपनीय तपास करत मूळचा राजस्थानचा रहिवासी आणि संबंधित पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या राहुल कुमार सेन याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सायबर भामटे पीडितांकडून बोगस बँक खात्यांवर लाखो रुपये वळते करून घेतात, अशीच काही बोगस खाती आरोपी राहुलच्या नियंत्रणात होती. पंपावर रोख रक्कम देऊन इंधन भरणाऱ्या ग्राहकांना राहुल लक्ष्य करत असे, ग्राहकांकडून आलेली रोख रक्कम पंपाच्या हिशोबात न दाखवता तितकीच रक्कम राहुल या बोगस खात्यांवरून पंपाच्या खात्यावर ऑनलाइन वळती करे, त्यामुळे ग्राहक, पेट्रोलपंप चालकाचे नुकसान होत नव्हते. मात्र, फसवणुकीतील रक्कम रोख स्वरूपात हाती येत होती, अशी माहिती राहुलच्या चौकशीतून पोलिसांना प्राप्त झाली.

गेल्या काही महिन्यांपासून दररोज फसवणुकीतील हजारो रुपये राहुल आणि त्याची टोळी या पद्धतीने रोख स्वरूपात स्वतःकडे घेत होती. त्याच्या पाच ते सहा साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, राहुल आणि त्याच्यासोबत अशाप्रकारे सायबर फसवणुकीतील रकमेचे रोखीकरण करणाऱ्या अन्य आरोपींची धरपकड केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com