गॅस सिलिंडरचा साठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा

गॅस सिलिंडरचा साठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा
Published on

गॅस सिलिंडरचा साठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा

मुंबई, ता. ३१ : अवैधरीत्या व्यासायिक गॅस सिलिंडरचा साठा, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या तरुणास शिधावाटप अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ३१) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गोवंडीत शिधावाटप अधिकाऱ्यांनी केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारी आधारे देवनार पोलिसांनी शाहिद अली सय्यद या तरुणाविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला. शिधावाटप अधिकारी गस्तीवर असताना गोवंडीतील कत्तल खानाजवळील वस्तीत गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा टेम्पो आढळला. झडती घेतली असता त्यात व्यावसायिक वापराचे १७ सिलिंडर आढळले, मात्र टेम्पोमालक शाहिदकडे ही सिलिंडर वाहतुकीसाठीची आवश्यक कागदपत्रे, गॅस एजन्सीसोबतचा करार आदी कोणतीही कागदपत्रे, परवानग्या नव्हत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com