(मुंबई टुडे साठी)मुंबई उपनगरात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी जाहीर

(मुंबई टुडे साठी)मुंबई उपनगरात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी जाहीर
Published on

खेळाडूंसाठी निवड चाचणी जाहीर
मुंबई उपनगरात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्राची सुरुवात

मुंबई, ता. १ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत ॲथलेटिक्स, नेमबाजी, टेबल टेनिस, बॉक्सिंग आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक क्रीडा प्रकारात सुमारे २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून दर्जेदार प्रशिक्षण, न्यूट्रिशन व पूरक आहार, भोजन व्यवस्था, क्रीडा साहित्य व गणवेश, वैद्यकीय तपासण्या तसेच देश-विदेशातील प्रशिक्षणासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत. इच्छुक खेळाडूंना यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत १० एप्रिलपर्यंत असणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवड चाचणीची तारीख व स्थळ स्वतंत्रपणे सांगण्यात येईल. तसेच खेळाडूंना निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्र व तीन पासपोर्ट साइज फोटोसोबत उपस्थित राहणे बंधनकारक असेल. इच्छुक खेळाडूंनी मिशन लक्षवेधच्या संकेतस्थळावर जात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com