

लोकलमध्ये चढताना
तरुणाचा भाईंदरमध्ये मृत्यू
मुंबई, ता. १ : भाईंदर रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढताना तोल जाऊन पडल्याने एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. फलाट क्रमांक २ वर लोकल येताच झालेल्या गर्दीमुळे हा तरुण रुळांवर पडल्याने गाडीची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र वा कागदपत्र नसल्याने त्याची ओळख अद्याप पटली नाही. त्यामुळे हा अपघात आहे की आत्महत्या, याबाबत सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील पोलिस ठाण्यांशी संपर्क साधण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे चर्चगेटच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.