७,६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल!

७,६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल!
Published on

७,६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल!
महापालिकेचा ऐतिहासिक विक्रम

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १ : महापालिकेच्या इतिहासात काल ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये महापालिकेने मालमत्ता करातून तब्बल सात हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतका विक्रमी महसूल संकलित केला आहे. विशेष म्हणजे ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी एकाच दिवसात ३९९ कोटी ७४ लाख रुपयांचा कर जमा करून पालिकेने स्वतःचेच सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
​​महापालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी सात हजार ३४१ कोटी रुपयांचे सुधारित उद्दिष्ट ठेवले होते; मात्र कर निर्धारण आणि संकलन विभागाच्या प्रभावी नियोजनामुळे निर्धारित उद्दिष्टाच्या १०३.६८ टक्के म्हणजेच ७,६१०.९० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. याव्यतिरिक्त अतिरिक्त दंडाच्या स्वरूपात ३०१ कोटी १३ लाख रुपयेदेखील पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. ​महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे. निवडणूक कामांची मोठी जबाबदारी पार पाडल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी दाखवलेले समर्पण आणि अथक परिश्रम यामुळेच हा टप्पा गाठणे शक्य झाले, अशा शब्दांत त्यांनी प्रशंसा केली. ​अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि सह आयुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याने हे यश मिळाले.
...
‘के पूर्व’ विभाग अव्वल
​प्रशासकीय विभागांचा विचार करता पश्चिम उपनगरातील ‘के पूर्व’ (अंधेरी पूर्व) विभागाने सर्वाधिक ७१९ कोटी २३ लाख रुपयांचा कर भरला आहे.
...
​प्रमुख विभागांची आकडेवारी
प्रशासकीय विभाग - संकलित मालमत्ता कर (कोटींमध्ये)
के पूर्व (अंधेरी पूर्व) - ७१९.२३
जी दक्षिण (वरळी/परळ) - ६७०.६४
के पश्चिम (अंधेरी पश्चिम) - ६२२.१६
एच पूर्व (वांद्रे पूर्व) - ५७२.७८
एच पश्चिम (वांद्रे पश्चिम) - ५३६.५५
...
क्षेत्रनिहाय संकलन
​पश्चिम उपनगरे : ३,७२१.३३ कोटी (सर्वाधिक योगदान)
​शहर विभाग : २,१०२.६० कोटी
​पूर्व उपनगरे : १,४५७.४१ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com