

मुंबई बंदर प्राधिकरणाची विक्रमी झेप
७५.१५ दशलक्ष टन माल हाताळणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबई बंदर प्राधिकरणाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७५.१५ दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळणी करत नवा विक्रम केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ९.५ टक्के वाढ नोंदवत बंदराने आर्थिक मंदी आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीतील अनिश्चिततेतही आपली क्षमता सिद्ध केली आहे.
मुंबई बंदर प्राधिकरणाने कार्यक्षमता वाढवण्यासाठी जहाजांचा सरासरी मुक्काम कालावधी ६४.०५ तासांवर आणण्यात आला असून, धक्क्याची उत्पादकता ११,३६५ टन प्रति जहाज-दिवस झाली आहे. वर्षभरात १,८५० जहाजांची हाताळणी करण्यात आली असून, त्यापैकी १,५१५ मालवाहू जहाजे होती. देशांतर्गत किनारी माल वाहतुकीत २१.९ दशलक्ष टन म्हणजेच ३० टक्के वाटा कायम राखण्यात आला आहे. खतांच्या कच्च्या मालाच्या आयातीत १४१ टक्के वाढ ही विशेष बाब ठरली. तसेच प्रीमियम आणि विद्युत वाहनांसह ८० हजारांहून अधिक वाहनांची हाताळणी करण्यात आली. रेल्वेमार्गे माल वाहतुकीतही लक्षणीय वाढ होऊन ती ५.२६ लाख टन झाली आहे. प्राधिकरणाने २०२६-२७ साठी ८० दशलक्ष टन माल हाताळणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ग्राफिक्स
- एकूण माल हाताळणी : ७५.१५ दशलक्ष टन
- वार्षिक वाढ : ९.५ टक्के
- द्रवरूप माल : ४६.८३ दशलक्ष टन
- कोरडा माल : २२.७७ दशलक्ष टन
- एकूण जहाजे : १,८५०
- प्रवासी जहाजे : ९५
- क्रूझ प्रवासी : २.५ लाख+
- खत आयातीत १४१ टक्के वाढ
- ८० हजार वाहनांची हाताळणी
- रेल्वे मालवाहतूक ५.२६ लाख टन
- जहाज मुक्काम वेळेत सुधारणा
....
पुढील वर्षाची दिशा
- ८० दशलक्ष टन माल हाताळणीचे लक्ष्य
- रस्ते आणि लॉजिस्टिक सुविधा सुधारणा
- प्रवेश व सुरक्षा व्यवस्था मजबूत
- मोठ्या जहाजांसाठी क्षमता वाढ
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.