

कर्तव्यावर असताना
पोलिसाचा मृत्यू
मुंबई, ता. १ : मुंबई पोलिस दलातील उपनिरीक्षक संदीप शिवतारे (वय ४२) यांचा बुधवारी (ता. १) कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शीव पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते.
रात्रपाळीला असलेल्या शिवतारे यांना पहाटे ५च्या सुमारास छातीत दुखू लागले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. तेथे सकाळी ७.३०च्या सुमारास त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
वरळी पोलिस वसाहतीत कुटुंबीयांसह राहणारे शिवतारे मूळचे सातारा जिल्ह्यातील धनगरवाडीचे रहिवासी हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई आणि भाऊ असा परिवार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत साळुंखे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.