कोरोनाकाळातील ऑक्सिजन खर्चावर संशय

कोरोनाकाळातील ऑक्सिजन खर्चावर संशय
Published on

कोरोनाकाळातील ऑक्सिजन खर्चावर संशय
प्लांटचे साहित्य कुठे?
स्थायी समितीत चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कोरोनाचा शिरकाव २०२० मध्ये झाला तेव्हा ऑक्सिजनची किंमत कळली. त्या वेळी पालिकेच्या रुग्णालयात एक हजार कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारले; मात्र आता त्या प्लांटचे साहित्य कुठे आहे, भविष्यात कुठला प्रसंग ओढवला तर ऑक्सिजनचा पुरवठा कुठून करणार, असा सवाल काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी बुधवारी (ता. १) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. त्या वेळी महालक्ष्मी रेस कोर्सवर कोरोना सेंटर सुरू केले होते, त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते अमय घोले यांनी या वेळी केली.
सदस्यांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव राखून ठेवण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. पालिका रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटाचा कालावधी, ऑक्सिजनची मागणी व कंत्राट रकमेत झालेली वाढ, ऑक्सिजनची मागणी आणि त्यासाठीचे कंत्राट याची मूळ रक्कम ४२ कोटी ९३ लाख ५५ हजार इतकी होती; मात्र कंत्राटात दोन कोटी ७७ लाख ७१ हजार रुपयांची वाढ होऊन अंतिम कंत्राटाची रक्कम ४५ कोटी ७१ लाख २६ हजार एवढी झाली.
ऑक्सिजन पुरवठ्याची सद्यःस्थिती काय आहे, याची माहिती द्या, ऑक्सिजन पुरवठ्याचे ऑडिट करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) सईदा खान यांनी केली. एमआयएमचे मो. जमीर कुरेशी यांनी ऑक्सिजनची मागणी का वाढली, रुग्णालयांमधील खाटांची संख्या आणि रुग्णसंख्या वाढली आहे का, अशी विचारणा केली. आपण जेव्हा एखादी वस्तू मोठ्या प्रमाणावर विकत घेतो, तेव्हा दर कमी असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

प्रस्‍ताव राखून ठेवला
भाजपच्या शीतल गंभीर यांनी कोरोनानंतर किती अतिरिक्त ऑक्सिजन वापरला गेला, असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर कंत्राटात सातत्याने फेरफार का होते, असेही विचारले. अमेय घोले यांनीही ऑक्सिजन पुरवठ्याचे ऑडिट करण्याची मागणी केली. एकूणच चर्चेचा रोख लक्षात घेता स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाकडून उत्तर येईपर्यंत प्रस्ताव राखून ठेवण्यात आल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com