

चालू आर्थिक वर्षात ई-वाहनांना प्रोत्साहन
२४६ कोटी रुपयांची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५अंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी २४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या धोरणात विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
या निर्णयानुसार ई-वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात आले आहे. तीन चाकी वाहनांसाठी एकूण २.५१ कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच राज्यातील प्रमुख शहरी वाहतूक उपक्रमांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुंबई, नागपूर महापालिका, पुणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिका या सहा उपक्रमांना मिळून ४.५५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे शहरांमध्ये सार्वजनिक ई-वाहतूक अधिक सक्षम होणार आहे.
...
ई-वाहन क्षेत्राला चालना!
काही कंपन्यांना ई-दुचाकी व ई-तीन चाकी वाहनांसाठी एकूण ४.४५ कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येणार आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, हा निधी २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ई-वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.