

दहावीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
मुंबई, ता. २ ः राज्य शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम आणि त्यासाठीचे पर्याय यावर शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्या व समुपदेशनही केले जाणार आहे. यासाठी विद्या प्राधिकरणाकडून ६ एप्रिल रोजीचा दिवस निश्चित करण्यात आला आहे.