प्रशिक्षण संचालनालयाला प्रथम क्रमांक

प्रशिक्षण संचालनालयाला प्रथम क्रमांक
Published on

प्रशिक्षण संचालनालयाला प्रथम क्रमांक
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले अभिनंदन

मुंबई, ता. ५ : राज्यातील १० हजारपेक्षा जास्त मंजूर पदसंख्या असलेल्या शासकीय आस्थापनांच्या वर्गवारीतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या आस्थापनेने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा व त्यांच्या चमूला प्रशस्तिपत्र देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सह्याद्री अतिथिगृह येथे ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालये व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात या वेळी माहिती तंत्रज्ञान तथा संस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह सर्व मंत्रालय विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सेवाकर्मी कार्यक्रम हा सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिनस्त शासकीय आस्थापना यांच्या स्तरावर यशस्वीपणे राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम, पदोन्नती, सरळसेवा भरती, गोपनीय अहवाल, अनुकंपा भरती, विभागीय चौकशी, आय गॉट प्रशिक्षण व महा-ई-एचआरएमएस या घटकांच्या अनुषंगाने गुणांकन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com