कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेची तयारी

कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेची तयारी
Published on

कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेची तयारी
१,४५५ कोटींचे प्रकल्प, नाशिक विभागातील सुविधेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यामध्ये सुमारे १,४५५ कोटी रुपयांचे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प समाविष्ट असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कुंभमेळ्यादरम्यान होणारी मोठी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुविधा वाढविणे आणि मार्ग क्षमता मजबूत करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
देवळाली, नाशिक रोड, लासलगाव आदी स्थानकांवर या अंतर्गत लूप लाइन वाढविणे, प्लॅटफॉर्म सुविधा सुधारणे तसेच प्रवासी व्यवस्थापनाशी संबंधित कामे सुरू आहेत. भुसावळ आणि साईनगर शिर्डी स्थानकांवरही सुविधा विस्ताराची कामे हाती घेण्यात आली असून, ही सर्व कामे २०२७ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

कामगिरीचाही आढावा
गोस्वामी यांनी या वेळी मध्य रेल्वेच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. यंदा सात नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या असून, त्यात वंदे भारत आणि अमृत भारत गाड्यांचा समावेश आहे. तसेच १० अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आल्या असून, हार्बर मार्गावर १४ वातानुकूलित लोकल गाड्यांची वाढ करण्यात आली आहे.
मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ४०० फेऱ्यांची वाढ होऊन एकूण ८,४०० फेऱ्या चालविण्यात आल्या. सणासुदीच्या काळात ३४८ विशेष गाड्या चालविण्यात आल्या असून, उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन १५ मार्चपासून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
रेल्वे पायाभूत सुविधांमध्येही वाढ करण्यात आली असून, ६६ नवीन थांबे विकसित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पाच नवीन स्थानके उभारण्यात आली असून, आणखी १२ स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तसेच ७७ गाड्यांचा वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढविण्यात आला आहे.

राबविण्यात येणारे प्रकल्प
कुंभमेळा २०२७साठी १४.५५ कोटी रुपयांचे प्रकल्प
नाशिक रोड, देवळाली, लासलगाव येथे सुविधा वाढ
भुसावळ व साईनगर शिर्डी स्थानकांचा विस्तार
२०२७ पूर्वी कामे पूर्ण करण्याचे नियोजन
सात नवीन गाड्या, १० अतिरिक्त सेवा
हार्बर मार्गावर १४ एसी लोकल गाड्यांची वाढ
सणासुदीत ३४८ विशेष गाड्या
७७ गाड्यांचा वेग १३० किमी प्रतितास
१२ नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com