राजा रवी वर्मा यांचे चित्र कोट्यवधींना विकले

राजा रवी वर्मा यांचे चित्र कोट्यवधींना विकले
Published on

राजा रवी वर्मा यांचे चित्र कोट्यवधींना विकले

मुंबई, ता. २ : प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या चित्राने लिलावात इतिहास घडवला. हे चित्र तब्बल १६७ कोटींहून अधिक किमतीला विकले गेले आहे. यामुळे भारतीय कलेतील सर्वाधिक किमतीला विकल्या गेलेल्या चित्राचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
मुंबईत झालेल्या या लिलावाचे आयोजन सॅफ्रनआर्ट या संस्थेने केले होते. लिलावादरम्यान या चित्रासाठी अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागली आणि अखेर विक्रमी किंमत मिळाली. हे चित्र खरेदी करणारे जागतिक स्तरावरील लस उत्पादक उद्योगपती श्रेयस पूनावाला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी हे चित्र सुमारे १७.९ दशलक्ष डॉलर किमतीला विकत घेतले. हे चित्र १८९०च्या दशकात साकारले गेले असून, त्यामध्ये आई यशोदा आणि बालकृष्ण यांचे प्रेमळ व भावनिक नाते अत्यंत सुंदरपणे दर्शवले आहे. कलाक्षेत्रात या चित्राला विशेष महत्त्व आहे. यापूर्वी भारतीय चित्रकलेतील सर्वाधिक विक्रीचा विक्रम एम. एफ. हुसेन यांच्या ‘ग्राम यात्रा’ या चित्राच्या नावावर होता. रवी वर्मा यांच्या या चित्राने तो विक्रम मागे टाकला आहे. तज्ज्ञांच्या मते, या विक्रीमुळे भारतीय कलेची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी आणि प्रतिष्ठा अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com