सहाशे रुपयांच्या वादात व्यावसायिकाचा ॲसिड हल्ला

सहाशे रुपयांच्या वादात व्यावसायिकाचा ॲसिड हल्ला
Published on

ॲसिड हल्ल्यात सात जण जखमी


मुंबई, ता. २ ः करार गावात सहाशे रुपयांवरून झालेल्या वादात एका व्यक्तीने सहा ते सात जणांना ॲसिडमिश्रित पाणी फेकून जखमी केले. समरबहाद्दूर सिंग (३८) असे या व्यक्तीचे नाव असून तो इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करतो. त्याच्याविरोधात कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी दुपारी घडली. या हल्ल्यात ॲसिडमिश्रित पाण्याचे शिंतोडे उडाल्याने सहा ते सात जण किरकोळ जखमी झाले. त्यातील काहींना उपचार करून सोडण्यात आले, तर काहींना शुक्रवारी सोडले जाईल, असे करार पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. आरोपी सिंग याचे इमिटेशन दागिने पॉलिश करण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या शेजारीच मयूर कानोजिया (२०) याचा दागिने बनवण्याचा कारखाना आहे. दोघांमध्ये नियमित व्यवहार होत होते. एका व्यवहारात कानोजियाने २६,४०० रुपयांऐवजी २७ हजार रुपये सिंगला दिले. ते लक्षात येताच त्याने अतिरिक्त सहाशे रुपयांची मागणी सिंगकडे केली. ते देण्यास सिंगने नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर बुधवारी कमोजिया सहा ते सात साथीदार सोबत घेत सिंगच्या दुकानात शिरला. पुन्हा वाद झाला. वाद तीव्र होताच सिंगने इमिटेशन ज्वेलरी पॉलिश करण्यासाठी वापर होणारे ॲसिडमिश्रित पाणी सर्वांवर भिरकावले. या प्रकरणात कनोजिया आणि त्याच्या साथीदारांविरोधातही कुरार पोलिसांनी दंगलीचा गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com