१३१ कोटींच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा नोंद

१३१ कोटींच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा नोंद
Published on

१३१ कोटींच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा नोंद

मुंबई, ता. ३ : व्यवसायासाठी महिना दीड टक्के व्याजावर घेतलेली तब्बल ६४.७० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि त्यावरील सुमारे ६६. ७१ कोटी व्याज थकवून परतफेड टाळल्याच्या आरोपात ट्रीयम्प रिॲलिटीचे मालक राजीव शहा, भागीदार अनंतराय शहा आणि कुमार शहा यांच्याविरोधात गुरुवारी (ता. २) लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेअर बाजार आणि बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीचा व्यवसाय करणाऱ्या जवाहरलाल शहा (७८) यांच्या तक्रारीआधारे ही कारवाई करण्यात आली. २०१५ ते २०२० या काळात जवाहरलाल यांनी टप्प्याटप्प्याने ६४.७० कोटी गुंतवले. त्यावर १८ टक्के वार्षिक परतावा देण्याचे आरोपींनी कबूल केले. काही वर्षे व्याजही दिले, मात्र त्यानंतर परतावा बंद झाला. २०२२ मध्ये आरोपींनी मूळ रक्कम आणि त्यावर साठलेले व्याज देण्यास नकार दिला, भेट टाळली, संपर्क तोडला, असा आरोप तक्रारदार जवाहरलाल यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com