दत्तक मुलीला ऑस्ट्रेलियाला नेण्यास परवानगी

दत्तक मुलीला ऑस्ट्रेलियाला नेण्यास परवानगी
Published on

दत्तक मुलीला ऑस्ट्रेलियाला नेण्यास परवानगी
मुलीचे जग बदलणार असल्याचे उच्च न्यायालयाचे निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ ः बाळाला दत्तक घेतल्याने जगात मोठे बदल होणार नाहीत; मात्र दत्तक घेतलेल्या बाळाचे जग मात्र नक्कीच बदलेल, असे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले आणि एका दाम्पत्याला दत्तक मुलीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जाण्यास परवानगी दिली.

प्रस्तुत प्रकरणात काही विशेष तथ्ये अंतर्भूत असल्याचे निरीक्षण न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने नमूद केले. यामध्ये हिंदू दत्तक आणि निर्वाह कायद्यांतर्गत कायदेशीररीत्या मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेचा समावेश आहे. नियम ६८ अंतर्गत विहित कार्यपद्धतीचे पालन न केल्याच्या कारणास्तव अन्य सर्व बाबी, प्रक्रिया रद्द करता येणार नाहीत. या दत्तक बाळाच्या भविष्याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. हे दत्तक विधान भारतीय कायद्यानुसार पूर्णपणे वैध असल्याचा निर्वाळा देऊन ‘हेग’ परिषदेनुसार या प्रकरणाला आंतर-देशीय दत्तकविधान मानले जात नाही, या ऑस्ट्रेलियन प्राधिकरणाच्या भूमिकेचाही न्यायालयाने विचार केला. तसेच, कलम ५ आणि १७ सह परिषदेच्या आवश्यकता लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. तांत्रिक कारणांमुळे मुलीला ऑस्ट्रेलियाला नेण्याची परवानगी न दिल्याने दत्तकविधान अयशस्वी होईल. तसेच, हमाअंतर्गत या दत्तकविधानात कोणतीही बेकायदेशीरता नाही; परंतु दत्तक मुलीला दत्तक पालकांचे प्रेम आणि काळजी मिळण्यासाठी याप्रकरणी गुंतागुंतीच्या कायद्यांमधून मार्ग काढावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पालकांचे कौतुक
याचिकाकर्त्या आईने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व मिळवूनही मुलीच्या काळजीसाठी तीन वर्षांपासून भारतातच राहत आहे. दत्तक पालकांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि भावनांच्या शुद्धतेबद्दल कोणालाही काही पटवून देण्याची गरज नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com