उमेदवारांना पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा

उमेदवारांना पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा
Published on

मुंबई, ता. ४ : शिक्षक भरतीच्या निवडीसाठी उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. या उमेदवारांना त्यांच्या सोईनुसार जास्तीत जास्त एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहेत. यासाठी शालेय शिक्षण विभागाने सुधारित आदेश जारी केले आहेत.

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीच्या निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड आणि नियुक्ती करता यावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाने हे बदल केले आहेत. यात मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबविणे आवश्यक राहील. तसेच यात सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे बंधनकारक असेल. यात उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील तर अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे अशा उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवारांचे वय देखीलसारखे असल्यास इयत्ता १२वीचे गुण विचारात घेतले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com